loader
Breaking News
Breaking News
Foto

आचरा पिरावाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) - आचरा पिरावाडी येथील श्री कृष्ण मंदिरात श्री तरुण संघ दक्षिणवाडा व हनुमान मंदिर न्यास यांच्यातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानिमित्त दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता संकष्टी पूजन, आरती व तीर्थप्रसाद, ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता ढोलताशाच्या गजरात श्रीं च्या मूर्तीचे आगमन, रात्री १० वाजता श्री कृष्ण जन्मकथा पोथी वाचन, रात्री ११ वाजता श्री कृष्ण जन्म आरती व तीर्थप्रसाद, पहाटे भजन, भूपाळी व काकड आरती, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९. ३० वा. भव्य काला दिंडी मिरवणूक, दुपारी २. ३० वा. श्रीं ची महाआरती, दुपारी ३ वाजता श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून यावेळी अवतार खेळ, गोपाळकाला, श्रींना दहीस्नान (दहीहंडी) आणि श्रींचे समुद्रामध्ये विसर्जन होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg