loader
Breaking News
Breaking News
Foto

भाईशा घोसाळकर हायस्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कडवई येथे स्काऊट-गाईड व हरित सेना विभागाच्या वतीने रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यालयातील प्रत्येक वर्गात रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर शाळेच्या सभागृहात मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच रिक्षाचालक -मालक संघटनेच्या सदस्यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तथा रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना देशसेवेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, “देशाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने सैन्यातच गेले पाहिजे असे नाही. चांगले शिक्षण घेऊन तुकाराम मुंढे यांच्यासारखा समाजाची जबाबदारी घेणारा अधिकारी बनण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पीएसआय भालचंद्र रेवणे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहण्याचे आवाहन केले. सध्या सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असून विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया व मोबाईल वापरताना विशेष सावधगिरी बाळगावी, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्काऊट मास्टर मिलिंद कडवईकर यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व विशद केले. यावेळी त्यांनी पौराणिक, ऐतिहासिक तसेच आधुनिक काळातील रक्षाबंधनाच्या विविध संदर्भांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अशोकी पवार, क्षितिज सरमोकादम व स्वराज चव्हाण यांनी रक्षाबंधन या विषयावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला पर्यवेक्षक संतोष साळुंके, पोलिस कॉन्स्टेबल गिरिजाप्पा लोखंडे, रिक्षाचालक-मालक संघटनेचे सचिव मोहन ओकटे, सदस्य दिनेश कुवळेकर, प्रकाश जवरत, चिखलीचे पोलिस पाटील रुपेश कदम, माजी विद्यार्थी साईराज गुरव, तानाजी दोरखडे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे, हरित सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांनी ५०० तिरंगा राख्या तयार केल्या होत्या. या राख्या देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय सैनिकांना पाठविण्यात आल्या.त्यामुळे रक्षाबंधनाला देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश कुंभार यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील वृक्षाला राखी बांधून ‘वृक्षांचे रक्षण करा’ असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत किंजळकर, सौजन्या महाडिक, प्रशांत साळवी, अरविंद सुर्वे यांचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg