loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी गावातून जाणार्‍या शक्तीपीठ महामार्गाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील लोकांची मागणी नसताना नको ते महामार्ग माथी मारले जात आहेत. चांगले रस्ते तोडले जात आहेत. एका बाजूला सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे तरी महामार्गाच्या नावाखाली लाखो कोटी कर्ज काढून महामार्ग मार्ग राजकीय मंडळी आपल्या स्वार्थासाठी सर्व सामान्य शेतकर्‍यांचे नुकसान करत आहे. नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर-सिंधुदुर्ग-दोडामार्ग मधून जाणार आहे. यात फुकेरी, झोळंबे गावचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान फुकेरी येथे शक्तीपीठ महामार्ग बाबत आयोजित जनसुनावणी फुकेरी ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत तसे निवेदन प्रांताधिकारी यांना दिले आहे. दोडामार्ग तालुका हा जैवविविधता, फळ बागायती यांनी बहरलेला आहे. हाच तालुका आता काही मंडळी महामार्ग तसेच दिल्ली हरयाणा येथील बलाढय मंडळींना आणून जमीन खरेदी करून या जमीनीत ये-जा करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग जोडण्यासाठी गावे, बागायती जमीन उध्वस्त केली जात आहे. पण हत्ती संकट, सासोली जमीन घोटाळा याबाबत सरकार लक्ष देत नाही. पण शक्तीपीठ महामार्ग यासाठी जोर-जबरदस्ती केली जात आहे. फुकेरी ग्रामस्थांची शक्तीपीठ महामार्ग बाबत भूमिका समाजावून घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी जनसुनावणी आयोजित केली होती.

टाईम्स स्पेशल

शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको आहे. ही भूमिका मांडली अगोदर ठोस माहिती द्या नंतर गावात पाऊल टाका असे सुनावले. जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग बाबत स्पष्ट माहिती दिली जात नाही. तोपर्यंत रस्त्याच्या भूविकास प्रक्रियेला विरोध राहील, अशी संयुक्त विनंती फुकेरी गावच्या वतीने प्रांताधिकारी तथा दंडाधिकारी (सावंतवाडी) आणि भूविकास अधिकारी वीरसिंग वसावे यांच्या समोर मांडली. तसे निवेदन सादर केले. वैज माऊली मंदिरात ही बैठक पार पडली. प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी तथा दंडाधिकारी वीरसिंग वसावे, महसूल सहायक अधिकारी पंकज मांजरेकर, इतर गावा प्रमाणे फुकेरी ग्रामस्थ यांनी या शक्तीपीठ महामार्ग याला विरोध दर्शविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg