loader
Breaking News
Breaking News
Foto

जामसंडे-कट्टा तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दयानंद शेडगे

देवगड (प्रतिनिधी) - जामसंडे-कट्टा ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीची पुनर्रचना करण्यात आली. यावेळी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दयानंद लवू शेडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेदरम्यान सरपंच श्वेता कोयंडे व ग्रामविकास अधिकारी श्रद्धा वळंजू यांनी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाचा विषय मांडत इच्छुकांची विचारणा केली. यावेळी दयानंद शेडगे यांच्या नावाला सर्वानुमते पसंती मिळाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दयानंद शेडगे यांनी यापूर्वी सलग तीन वर्षे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना गावातील शांतता व सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी उल्लेखनीय काम केले आहे. गावात निर्माण होणाऱ्या विविध तंट्यांमध्ये योग्य तो समन्वय साधून त्यांचे निवारण करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. दयानंद शेडगे हे सामाजिक कार्यासोबतच विविध कलाक्षेत्रातही सक्रिय असून भजनीबुवा, गायक, नाटककार, तबलावादक, हार्मोनियमवादक तसेच कलाप्रेमी म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे ग्रामस्थांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी आहे.

टाईम्स स्पेशल

निवडीनंतर ग्रामसभेत दयानंद शेडगे यांचे उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी सरपंच श्वेता कोयंडे, ग्रामविकास अधिकारी श्रद्धा वळंजू, उपसरपंच गणेश कांगुटकर, आशा स्वयंसेविका चित्रा किर, सदस्य जगन्नाथ कोयंडे, तेजस्विनी दयानंद शेडगे, प्रतिभा शेडगे, मनाली मयेकर, बचत गटातील महिला, ग्रामस्थ शुभास किर, राजेंद्र कोयंडे यांच्यासह अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg