मालवण (प्रतिनिधी) - सभासद आणि हजारो ग्राहकांच्या सहकार्यामुळे मालवण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची यशस्वी वाटचाल सुरू असून, संस्थेने ९७ वर्षे पूर्ण केली आहेत. केवळ आर्थिक नफा हा उद्देश न ठेवता ग्राहकांचे समाधान, उत्तम दर्जाचा माल आणि विनम्र सेवा या त्रिसूत्रीवर संस्थेचे कामकाज सुरू आहे. सभासद आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे संस्थेची ९७ वर्षांची वाटचाल शक्य झाली असून, भविष्यातही त्यांच्या सहकार्याने संस्था अधिक सक्षम आणि ग्राहकाभिमुख करण्याचा निर्धार चेअरमन राजन गावकर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केला. मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा चेअरमन राजन गावकर यांच्या अध्यक्षतेखाली कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी व्हा. चेअरमन कृष्णा ढोलम, संचालक महेश मांजरेकर, के. पी. चव्हाण, अशोक तोडणकर, विजय ढोलम, प्रफुल्ल प्रभू, महेश गावकर, अमित गावडे, रमेश हडकर, सुरेश चौकेकर, अभय प्रभुदेसाई, राजेंद्र प्रभुदेसाई, अमृता सावंत, व्यवस्थापक रघुनाथ चव्हाण, यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. संघाच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच वर्षभरात जास्तीत जास्त साहित्य खरेदी करणाऱ्या दोन सभासदांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच कृषी विभागाच्या वतीने मोबाईलवरूनच खत बुकिंग कशी करावी याची माहिती उपस्थित सभासद शेतकऱ्यांना दिली.
यावेळी चेअरमन राजन यांनी म्हणाले, संस्थेच्या व्यवसायवृद्धीसाठी संचालक मंडळाने ग्राहक व सभासदांच्या सूचना आणि गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामांचे नियोजन केले आहे. त्यामध्ये खत गोडाऊन, सिंधुसागर इमारतीचा विकास तसेच सिंधुबझारच्या विस्ताराचा समावेश आहे. संस्थेचे स्वतंत्र खत गोडाऊन असावे, या उद्देशाने मालवण तालुक्यातील कातवड-खैदा येथे स्वतंत्र खत गोडाऊन उभारून ते कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र शहरातील ग्राहकांना खत खरेदीसाठी खैदा-कातवड येथे जावे लागत असल्याने मुख्य कार्यालयाजवळच गोडाऊन असावे, अशी मागणी होत होती. ग्राहकांची ही अडचण लक्षात घेऊन संस्थेने मुख्य कार्यालयाजवळ नवीन खत गोडाऊन बांधून पूर्ण केले असून तेही कार्यान्वित करण्यात आले आहे. संस्थेच्या नवीन ‘सिंधुसागर’ इमारतीचे तळमजल्यासह सहा व्यापारी गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यापैकी दोन गाळ्यांमध्ये संस्थेचा भारतगॅस विभाग सुरू करण्यात आला असून उर्वरित चार गाळे टीजेएसबी बँकेला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. या माध्यमातून संस्थेला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे.
संस्थेचा सिंधुबझार व्यवसाय दरवर्षी वाढत असून गर्दीच्या हंगामात ग्राहकांना जागा अपुरी पडत आहे. वाढता व्यवसाय आणि ग्राहकांची वाढती गरज लक्षात घेऊन सिंधुबझार इमारतीचे विस्तारीकरण करून अधिक प्रशस्त बाजारपेठ सुरू करण्याचे धोरण संस्थेने आखले आहे. या कामाची लवकरच अंमलबजावणी करण्याचा संस्थेचा मानस आहे. व्यवसाय वृद्धीसाठी संस्थेने ग्रामीण भागावरही लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांशी थेट संपर्क साधून त्यांना आवश्यक माल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे संस्थेच्या व्यवसायाचा विस्तार तालुक्याच्या ग्रामीण भागातही होणार असल्याचे सांगितले. या सभेत अशोक सावंत, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, राजन भोजने, आबा ढोलम, मनोज लुडबे, आपा चव्हाण, प्रदीप ढोलम, दाजी हडकर, नंदू देसाई, भगवान लुडबे, अनिल न्हीवेकर, संतोष गावकर, जॉन नऱ्होना, मोहन चव्हाण, देवेंद्र हडकर, संतोष पालव, मनोज राऊत, प्रसाद आडवणकर आदिनी चर्चेत सहभाग घेतला.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.