loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टी आयोजित महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने भव्य मंगळागौर सोहळा ,मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती

रत्नागिरी : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याने महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस , भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री तथा भा. ज. पार्टीचे ज्येष्ठ नेते आशिषजी शेलार जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली १ सप्टेम्बर रोजी वि.दा.सावरकर नाट्यगृह येथे भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटींची उपस्थिती. यामध्ये ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी (राणादा), ‘तुझ्यात जीव रंगला’ व ‘सरस्वती निवास’ फेम अक्षया देवधर (मास्तरीणबाई), ‘बाणू’ या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री ईशा केसकर, प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत तसेच स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ फेम अभिनेत्री गिरिजा प्रभू यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

टाइम्स स्पेशल

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा वर्षाताई परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मंगळागौर सोहळ्यामध्ये पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांसाठी विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg