पनवेल :- गोदरेज प्रॉपर्टीजने पनवेल येथे विकसित केलेल्या १४५ एकरावरील गोदरेज सिटी या वैविध्यपूर्ण सुसज्ज टाउनशिपमध्ये आता ऑन कोर्ट सुरू झाले आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या इनडोअर पॅडेल सुविधांपैकी एक आणि पनवेलमधील सर्वात मोठे पॅडेल केंद्र असून, येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चार इनडोअर कोर्ट्स उपलब्ध आहेत. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उद्योग, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील १०० हून अधिक मान्यवर उपस्थित होते; तसेच जागतिक क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेले पॅडेलपटू आर्टुरो कोएलो आणि ऑगस्टिन तापिया यांनीही या सोहळ्यात भाग घेतला. पॅडेल सुविधेच्या उद्घाटनासोबतच, गोदरेज सिटी पनवेलने एका विशेष नवीन टप्प्याची घोषणा केली आहे. यामध्ये तीन आणि चार बेडरूम्स असलेल्या स्काय व्हिलाचा समावेश असून, हे व्हिला शांत टेकड्यांच्या सानिध्यात आणि नऊ होलच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोल्फ कोर्स तसेच पॅडेल कोर्ट्सच्या अगदी जवळ वसलेले आहेत.
येथील प्रत्येक निवासस्थानातून एका प्रशस्त डेकवर जाता येते आणि या संपूर्ण टप्प्यात आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून त्यासंबंधित अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे, दैनंदिन जीवनशैली, आरोग्यदायी वातावरणासोबतच आणि जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांचा संगम एकाच ठिकाणी साधला गेला आहे. पॅडेलपार्क इंडियाच्या भागीदारीत विकसित केलेल्या, ऑन कोर्टच्या चार कोर्ट्समध्ये वैशिष्ट्यपूर्ण टेराकोटा फिनिश असलेले टर्फ पृष्ठभाग आहेत, जे स्पर्धात्मक खेळ आणि दैनंदिन वापर या दोन्हींसाठी डिझाइन केलेले आहेत. ही सुविधा टाऊनशिपच्या वाढत्या क्रीडा आणि जीवनशैली परिसंस्थेमध्ये भर घालते, जी विस्तीर्ण हिरव्यागार जागांमध्ये वसलेली आहे आणि ज्यात आधीपासूनच ९-होल गोल्फ कोर्सचा समावेश आहे. ही सुविधा गोल्फ आणि पॅडेलला एकाच ठिकाणी एकत्र आणते आणि जीवनशैली-केंद्रित मिश्र-वापर विकास म्हणून गोदरेज सिटी, पनवेलच्या स्थानाला अधिक बळकटी देते.
गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडचे मुंबई विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितेश शाह म्हणाले, "जागतिक स्तरावर पॅडेल खेळामध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे आणि भारतात या खेळाबाबत दिसून येणारा उत्साह अत्यंत रोमांचक आहे. जसजसा सहभाग वाढतो आहे, तसतशी या खेळासाठी एक मजबूत परिसंस्था निर्माण करण्यासाठी उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधांची निर्मिती करणे आणि हा खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे ठरेल. पनवेल येथील गोदरेज सिटी या १४५ एकरच्या मिक्स्ड-युज (निवासी तसेच व्यावसायिक अशा मिश्र वापराच्या) टाउनशिपमध्ये, पॅडेलपार्क इंडिया सोबतच्या भागीदारीतून आणि पनवेलमधील खास पॅडेलसाठी असलेल्या सर्वात मोठ्या सुविधेच्या विकासामधून आम्ही हा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणत आहोत. ९-होल गोल्फ कोर्स, विस्तीर्ण मोकळ्या हिरवळीच्या जागा आणि विकसित होत असलेली क्रीडा परिसंस्था यांमुळे गोदरेज सिटी, पनवेलची संकल्पना ही सक्रिय जीवनशैलीवर आधारित आहे. पॅडेल ऑल स्टार्सला पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहे आणि आम्हाला आशा आहे की, यामुळे अनेक लोकांना या रोमांचक खेळाची ओळख होईल.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.