loader
Breaking News
Breaking News
Foto

शृंगारतळी जि.प. गट सदस्य प्रमोद गांधी यांच्या वतीने जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना स्टील बॉटल वाटप

वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना गुहागर यांच्या वतीने तसेच मनसेचे गुहागर व चिपळूण तालुका संपर्क अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद मुंढर शाळा नं. १, गिमवी शाळा, जानवळे आदर्श शाळा नं.१, उर्दू शाळा कोंड शृंगारी येथील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या स्टील बॉटल वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका सचिव प्रशांत साटले, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर, उप तालुकाध्यक्ष स्वप्निल जाधव, विश्वजीत पोतदार, राहुल जाधव यांच्यासह जानवळे आदर्श शाळा नं.१ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कोंडविलकर, शिक्षक दर्शना समगिस्कर, चंद्रकांत बेलेकर, सचिन कांबळे सुनील भांड, सोनाली भादेकर, तसेच कोंड शृंगारी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जुनेद तांबे, शबनम शिरगावकर, सुजन घारे यांच्यासह शिक्षक अशफाक अमर कुपे, फिरदोस पठाण, उमेरा अलगूर, शाहीर तांबोळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा परिषद शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिक बॉटल चा वापर करत होते परंतु प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांनी त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये विद्यार्थ्यांना स्टील बॉटल चे वाटप करत आहेत. शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच पालक यांनी प्रमोद गांधी यांना त्यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg