खेड (प्रतिनिधी) - रोटरी क्लब ऑफ खेडच्या 2026-27 या रोटरी वर्षासाठी नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवार, दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथे उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला. सदर सोहळ्याप्रसंगी रो. डॉ. रियाझ मुल्ला यांनी रोटरी क्लब ऑफ खेडच्या अध्यक्षपदाची, रो. सुयोग बेडेकर यांनी सचिवपदाची, तर रो. जय करुणाकरन यांनी खजिनदारपदाची सूत्रे स्विकारली. याचवेळी 2026-27 या वर्षाच्या संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांचाही पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे इंस्टाॅलेशन ऑफिसर म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे क्लब को-ऑर्डिनेशन सेक्रेटरी रो. प्रणय तेली यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ देत त्यांच्या हाती जबाबदारी सोपविली.
कार्यक्रमाला रो. अविनाश पालशेतकर, असिस्टंट गव्हर्नर (AG), रोटरी डिस्ट्रिक्ट 3170, रो. बिपिनदादा पाटणे, चार्टर्ड अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ खेड तसेच रो. डॉ. उपेंद्र तलाठी, अध्यक्ष रोटरी प्रतिष्ठान, खेड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. माजी अध्यक्ष रो. मंदार संसारे आणि सचिव रो. ॲड. मिलिंद जाडकर यांनी आपल्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक आणि सेवाभावी उपक्रमांचा आढावा घेत नूतन कार्यकारिणीकडे क्लबची जबाबदारी सुपूर्द केली. त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. नूतन अध्यक्ष डॉ. रियाझ मुल्ला यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर आपल्या मनोगतात रोटरी क्लबच्या सेवाकार्याला अधिक व्यापक, प्रभावी आणि समाजाभिमुख स्वरूप देण्याचा संकल्प व्यक्त केला. शिक्षण, आरोग्य, सामाजिक विकास, गरजू घटकांना मदत तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून खेड परिसराच्या विकासात योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
रोटरी क्लब ऑफ खेड हा आपल्या समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकीसाठी परिचित असलेला क्लब असून, विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांसोबतच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्यातही क्लबने नेहमीच आघाडीची भूमिका बजावली आहे. ‘स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी’ या सेवाभावी भावनेतून रोटरीचे सदस्य सातत्याने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देत आहेत. नूतन कार्यकारिणीने “सेवेचा वारसा पुढे नेत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या ऊर्जेने कार्य करण्याचा” संकल्प व्यक्त केला. त्यामुळे आगामी वर्षात रोटरी क्लब ऑफ खेडच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रमांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.