loader
Breaking News
Breaking News
Foto

महिला बाल कल्याण सभापती तथा नगरसेविका दिपाली भालेकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती

सावंतवाडी - सावंतवाडी येथील दिपाली दिलीप भालेकर महिला बालकल्याण सभापती तथा नगरसेविका यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांच्या विविध कागदपत्रांच्या साक्षांकनाच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली असून त्याचा कार्यकाळ 4 ऑगस्ट 2026 ते 3 ऑगस्ट 2031 असा पाच वर्षाचा राहणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबतचे नियुक्ती प्रमाणपत्र सिंधुदुर्गचे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. दिपाली भालेकर यांच्या नियुक्तीबद्दल सावंतवाडी परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या माध्यमातून नागरिकांना साक्षांकनाच्या कामासाठी सुलभ व वेळेवर सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg