loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेकडून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य

खेड (प्रतिनिधी )- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. २०१० पासून खेड आणि दापोली तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या ४२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या, गणवेश, दप्तरे, संगणक, प्रिंटर आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. संस्थेच्या माहितीनुसार आतापर्यंत ३२ हजार ५२० विद्यार्थ्यांना वह्या, ६५० विद्यार्थ्यांना गणवेश आणि ७८० विद्यार्थ्यांना दप्तरे देण्यात आली आहेत. तसेच २५ शाळांना संगणक आणि १० शाळांना प्रिंटरचे वाटप करण्यात आले आहे. गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांची वार्षिक कॉलेज फी भरणे, शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिर आणि एसएससी व्याख्यानमाला असे उपक्रमही सातत्याने सुरू आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तळे म्हसोबाची येथील शाळेच्या इमारतीत स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका, ग्रंथालय आणि व्यावसायिक शिक्षण केंद्र उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. यासोबतच शेतकर्‍यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन आणि महिलांना शिवणकामासह विविध कौशल्य प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. मात्र या उपक्रमांसाठी शाळेची इमारत व परिसर दुरुस्ती, तसेच आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे संस्थेने सीएसआर निधी आणि देणगीच्या माध्यमातून या सामाजिक कार्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg