loader
Breaking News
Breaking News
Foto

नेपाळने सर्व देशांची मदत का नाकारली ? पंतप्रधान मोदी यांनी दिला विश्वास आम्ही दुखद प्रसंगी सोबत आहोत !.

काठमांडू : " आज तरी आम्हाला तुमची मदत नको आहे , आमच्या देशाचे सैन्यबळ मदत कार्यात पुरेसे आहे " असे नेपाळने म्हटले आहे .नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात आतापर्यंत ५४७ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप हजारपेक्षा अधिक जण बेपत्ता असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तिबेट सीमेवरून आलेल्या पुराचा फटका नेपाळला बसला आहे. भारतानं नेपाळला वैद्यकीय मदत आणि बचाव साहित्य पाठवलं आहे. बऱ्याचशा देशांनी नेपाळला मदत देण्याचा मानस व्यक्त केला आहे. पण नेपाळनं मदत घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. मात्र भारतातर्फे शेजारी म्हणून विश्वास दिला , दीर्घकाळ संवाद साधला .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर तिथले त्यांचे समकक्ष बालेन शाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि जीवित व वित्तहानीबद्दल दुःख व्यक्त केले. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.नेपाळला शक्य ती सर्व प्रकारची मानवतावादी मदत पुरवण्यासाठी भारत सज्ज आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजच्या स्थितीत नेपाळचं सैन्य आणि बचाव दल या आपत्तीचा सामना करण्यास सक्षम असल्याचं बालेन शाह सरकारनं म्हटलं आहे. आम्हाला सध्या तरी कोणत्याही मानवी मदतीची गरज नसल्याचं नेपाळ सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पण नेपाळ सरकार आर्थिक आणि बचाव कार्याशी संबंधित मदत स्वीकारणार आहे.गेल्या काही वर्षांपासून नेपाळवर सातत्यानं नैसर्गिक संकट कोसळत आहेत. मात्र तरीही नेपाळनं मानवी मदत घेण्यास नकार दिला. नेपाळ सरकारनं मानवी मदत नाकारण्यामागचं नेमकं कारण सांगितलेलं नाही. नेपाळनं आतापर्यंत भारत, चीन, अमेरिका , जपान, बांग्लादेश , दक्षिण कोरिया, श्रीलंकेसह अर्धा डझन देशांची मानवी मदत नाकारलेली आहे.

टाइम्स स्पेशल

महत्वाचे म्हणजे नेपाळमध्ये २०१५ साली मोठा भूकंप झाला होता. त्यात अनेकांचा मृत्यू झाला. या नैसर्गिक संकटानं नेपाळ काही वर्षे मागे गेला. त्यावेळी जवळपास ७० देश नेपाळच्या मदतीला पुढे आले होते. त्यांनी बरेच महिने बचाव कार्य राबवलं. या दरम्यान नेपाळ सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर तिथले त्यांचे समकक्ष बालेन शाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि जीवित व वित्तहानीबद्दल दुःख व्यक्त केले. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.नेपाळला शक्य ती सर्व प्रकारची मानवतावादी मदत पुरवण्यासाठी भारत सज्ज आहे. आमची पथके बचाव आणि मदतकार्यात एकत्रितपणे काम करत आहेत.पंतप्रधान मोदींनी नेपाळमधील पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आणि बचाव व मदतकार्यासाठी भारताकडून मदत देऊ केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg