loader
Breaking News
Breaking News
Foto

'प्रत्येक बालकाचे १८ मूलभूत हक्क' या कलरिंग बुकचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : 'प्रत्येक बालकाने जाणून घ्यावेत असे १८ मूलभूत हक्क' या कलरिंग बुकचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. न्याय संस्था आणि विधि सेंटर फॉर लीगल पॉलिसी यांच्यावतीने बालकांना त्यांच्या संविधानिक हक्कांची माहिती सहज, आनंददायी पद्धतीने मिळावी, यासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए), मुंबई येथे आयोजित कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डंगरे, माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण, अनिशा गोपी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने राज्यात संविधान फेलोशिपचाही शुभारंभ करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रयत्नांना कल्पकतेतून बळ देणाऱ्या या कलरिंग बुकच्या माध्यमातून बालकांना त्यांच्या हक्कांची माहिती सहज आणि आनंददायी पद्धतीने मिळणार आहे. रंग भरताना बालकांच्या मनावर त्यांच्या हक्कांची जाणीव रुजण्यास मदत होणार असल्याचा आनंद आहे. तसेच संविधान फेलोशिपच्या माध्यमातून कायदे आणि संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी संस्थेने घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण आहे, असे मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

टाइम्स स्पेशल

बालकांच्या हक्कांची माहिती त्यांना लहान वयापासूनच व्हावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेले हे कलरिंग बुक मोफत उपलब्ध असून या बुकमध्ये निवारा, पोषण, शिक्षण आणि मोफत कायदेशीर मदत यांसह बालकांच्या १८ महत्त्वपूर्ण हक्कांची माहिती देण्यात आली आहे. तसेच बालविवाह, बालमजुरी, रॅगिंग, बुलिंग आणि लैंगिक शोषण या विषयांचाही बालकांना समजेल अशा संवेदनशील पद्धतीने समावेश करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg