loader
Breaking News
Breaking News
Foto

बुरंबी येथे दादासाहेव सरफरे विद्यालयात रामभाजी कार्नीव्हल संपन्न

बुरंबी (संगमेश्वर) येथील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित दादासाहेब सरफरे विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य महाविद्यालयात रामभाजी कर्निव्हल संपन्न झाले. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना स्थानिक व पारंपारीक रानभाज्यांची ओळख व्हावी, या रानभाज्यांच्या औषधी गुणधर्माची माहिती मिळावी तसेच पारंपारीक खाद्य संस्कृतीचे जतन संवर्धन व्हावे या उद्देशाने संस्था सभागृहात संपन्न झालेल्या या रानभाजी कार्निव्हलचे उद्घाटन डॉ.मनोज लोहिया यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात इयत्ता ५ वी ते ११ वी मधील विद्यार्थ्यानी उत्स्फुर्त सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यानी दक्षिण रत्नागिरी कोकण पट्‌ट्यात सहज उपलब्ध होणा-या व पावसाळी उपज होणा-या रानभाज्यांची व पाककृतीची आकर्षक मांडणी करुन त्यांच्या औषधी गुणांची माहिती दिली. भारंगी, फोडशी, अळु (तेरी), टाकळा, कुई, करटोळी, फोकळा, आघाडा, पात्री, तिळ पाने, पेवगा, रानसुरण, अळंबी, शेवगा, कुडा शेंग व घोळ इत्यादी भाज्यांच्या पाककृती सर्वांचे लक्ष वेधुन घेत होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg