loader
Breaking News
Breaking News
Foto

दर्याराजाच्या चरणी श्री देव रामेश्वराचा ‘मानाचा सोन्याचा नारळ’!

देवगड (प्रतिनिधी) - मिठबाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात नारळी पौर्णिमेचा सण पारंपरिक उत्साह आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. प्राचीन परंपरेपासून चालत आलेली ही रूढी गावातील गावघर रयत आजही त्याच उमेदीने आणि उत्साहाने जपत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मानाच्या सोन्याच्या नारळाची विशेष पूजा करण्यात आली. तसेच मंदिरातील सर्व देवतांना पोवती (राखी) अर्पण करून धार्मिक विधी पार पाडण्यात आले. यानंतर चार वाजता श्री देव रामेश्वराचा आशीर्वाद घेऊन मानाचे सोन्याचा श्रीफळ ढोल-ताशांच्या गजरात आणि श्री देव रामेश्वराच्या जयघोषात गावघर रयतेची मिरवणूक गजबादेवी सागरतिर्थाच्या दिशेने मार्गस्थ झाली. पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या सोहळ्यात गावांतील ग्रामस्थांसह अनेक व्यापारी बांधवांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. श्री गजबादेवी सागरतीर्थावर पोहोचल्यानंतर विधिवत पूजन करून श्री देव रामेश्वराचा मानाचा सोन्याचा नारळ दर्याराजाला अर्पण करण्यात आला. नारळ अर्पण करताना उपस्थितांनी श्री देव रामेश्वराचा जयघोष केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg