दोडामार्ग (प्रतिनिधी) - तालुक्यातील सुपारी बागायतदार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे सुपारीची बेसुमार फळगळ होत आहे. बागांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक फळे गळून पडत असल्याने बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सुपारीवरच अर्थकारण अवलंबून असल्याने शेतकरी पुर्णपणे कोलमडून पडला आहे. सुपारी हे प्रमुख पीक आहे. सुपारीची गळ मोठ्या प्रमाणात झाल्याने बागायतदारांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे.
तालुक्यात काजू, नारळ या पारंपरिक पिकांनंतर सुपारी हे महत्त्वाचे पीक म्हणून उदयास आले आहे. शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात सुपारीची लागवड केली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसात झालेल्या वादळी वार्यासह पावसामुळे तयार झालेली सुपारी गळून पडत आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, शासनाने पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदार यांच्या वतीने अंकुश वेट यांनी केली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार ’कोळेरोग’ या रोगामुळे ही गळ होत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. अचानक आलेल्या उष्णतेनंतरच्या पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या संकटामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदारांमधून होत आहे, पालकमंत्री नितेश राणे साहेबांनी सुपारी बागायतदारांची व्यथा जाणून घेऊन सुपारी हे पीक नैसर्गिक आपत्तीत समाविष्ट करुन नुकसानभरपाई शेतकर्यांना देण्यात यावी अशी मागणी अंकुश वेट यांनी केली आहे.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.