loader
Breaking News
Breaking News
Foto

अधिवक्ता परिषद कोकण प्रांताचा अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

खेड (प्रतिनिधी): अधिवक्ता परिषद कोकण प्रांताच्यावतीने संघटन व आउटरीच विभागाचा एकदिवसीय अभ्यासवर्ग शनिवारी, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी ज्ञानदीप लॉ कॉलेज (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथे अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात प्रास्ताविक प्रांत संघटन उपाध्यक्षा प्रियाताई लोवलेकर यांनी केले. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एन. डी. देशपांडे आणि अ. भा. अधिवक्ता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष परिमल पाठक (गोधरा, गुजरात) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने अभ्यासवर्गाचे उद्घाटन करण्यात आले. दिवसभरात विविध विषयांवर अभ्यासू सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अधिवक्ता मिलिंद जाडकर आणि तालुका अध्यक्ष श्रीमती संगीता बापट यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवक्ता प्रितेश जाधव, अधिवक्ता अक्षया सोमण गोडबोले, अधिवक्ता अनुजा राऊत, अधिवक्ता ऋग्वेद भावे, अधिवक्ता दिया देवळेकर, अधिवक्ता जितेंद्र बेलोसे आणि अक्षय दिवाळे यांनी परिश्रम घेऊन हा अभ्यासवर्ग यशस्वीरीत्या पार पाडला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg