खेड - रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड येथे शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सी. बी. एस. ई. यंग इंडिया कलिनरी चॅम्पियनशिप (YICC) ही शालेय स्तरावरील स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. सदर स्पर्धेसाठी इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले होते. इयत्ता 6 वी ते 8 वी या गटातील विद्यार्थ्यांनी गॅसचा वापर न करता विविध चाट पदार्थ तयार करून आपली कल्पकता आणि पाककौशल्य दाखविले. दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, स्वच्छता, चव, सादरीकरण आणि सांघिक कार्य यांचा सुंदर समन्वय साधला. यामध्ये पहिल्या गटातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सँडविच, शेवपुरी , भेळपुरी, दहीवडा, रगडा पॅटिस, आलू टिक्की चाट, समोसा चाट, कचोरी चाट, कॉर्न चाट आणि स्प्राउट्स चाट अशा विविध पदार्थांची निर्मिती केली. विविध चटण्या, भाज्या, शेव आणि इतर घटकांचा कल्पक वापर करत विद्यार्थ्यांनी पदार्थांना आकर्षक रूप दिले.
गॅसविरहित गटातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही उष्णतेच्या साधनाचा वापर न करता उपलब्ध साहित्याचा कल्पकतेने उपयोग करून चविष्ट आणि आकर्षक पदार्थ साकारले. यामध्ये समर्थ विक्रांत खडपेकर व पारस पुंडलिक खोपकर - प्रथम क्रमांक, उमर काफियत दाबिर व पृथ्वी आलोककुमार सिंग -द्वितीय क्रमांक, तर प्रेम स्वप्निल बनसोडे - तृतीय क्रमांक तर इयत्ता 9 वी ते 12 वी या गटातील विद्यार्थ्यांनी गॅसचा वापर करून विविध पदार्थ तयार केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंपाक प्रक्रियेतील कौशल्य, अचूकता आणि वेळेचे नियोजन यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या गटात रिज मुसा काझी व आर्या राजेंद्र कदम - प्रथम क्रमांक, कार्तिकी सचिन तटकरी व शर्वरी अवधूत मोरे - द्वितीय क्रमांक, समृद्धी जगदीप कोठारे व पालवी प्रविण सकपाळ - तृतीय क्रमांक पटकावून यश संपादित केले. या स्पर्धेत केवळ चवीलाच नव्हे, तर स्वच्छता, पौष्टिकता, सादरीकरण, सर्जनशीलता, वेळेचे नियोजन आणि टीमवर्क यांनाही विशेष महत्त्व देण्यात आले. प्रत्येक गटाने आपल्या पदार्थाला वेगळी ओळख देत उत्साहाने सादरीकरण केले. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेचे वातावरण आनंद, उत्साह आणि चुरशीने भारले होते.
वरील स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या गटांची YICC च्या प्रादेशिक स्तरावरील स्पर्धेसाठी (Regional Level Competition) निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या पाककला कौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा त्यांच्या आत्मविश्वास, सर्जनशीलता, नेतृत्वगुण आणि सांघिक भावना विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. वरील स्पर्धेसाठी रोशनी बाविस्कर, श्लोका पाटणे, श्वेता भंडारी, नीता चिखले व समीर धुमाळ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षकांचे आभारपत्र देऊन आभार मानण्यात आले.वरील स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तेजश्री क्षीरसागर व अमृता जाधव यांनी विशेष मेहनत घेतली. संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.