खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये शनिवार दिनांक 29 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न झाला. भारताचे महान क्रीडा क्षेत्रातील व्यक्तिमत्व मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून भारताच्या समृध्द क्रीडा वारशाचा गौरव केला जातो. आणि नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनाचा नियमित भाग म्हणून खेळांचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. रोटरी शाळा ही खेळ आणि क्रीडापटू यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. सदर क्रीडादिनाचे उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवर रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलचे चेअरमन डाॅ. उपेंद्र तलाठी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आला. यावेळी रोटरी स्कूलचे चेअरमन डाॅ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षकवृंद विद्यार्थी, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर व उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, रोपटे व पुस्तकरुपी भेट देऊन करण्यात आले. याचेच औचित्य साधून शाळेतील राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तायक्वाॅडोत महम्मद आझम सलीम मुकादम याचा विशेष सत्कार करण्यात आला. दि. 19सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान पानिपत,हरियाणा येथे होणाऱ्या सी.बी.एस.ई. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली त्याबददल त्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तद्नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यामध्ये तायक्वाॅडो या खेळप्रकारामध्ये ईश्वरी गोरे, रुद्र शिगवण, आर्णव गोफणे, आयुष जाधव, रूद्र अदावडे मल्लखांब या खेळ प्रकारामध्ये दुर्वांकूर देवघरकर, योगा खेळप्रकारामध्ये स्पंदन धामणे, श्री दळवी, श्लोक दळवी, शाश्वत धुमाळ, आयुष पाटील, प्रांजल आंबेडे, अनुष्का म्हातले, ईषदा भोसले, श्रावणी दिवेकर या खेळाडूंचा शाळेतर्फे ट्रॅक सुट देवून सत्कार करण्यात आला.
सर्व खेळाडूंना कृणाल चव्हाण यांनी क्रीडादिनाविषयीं मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले. सदरच्या क्रीडामहोत्सव उद्घाटनाप्रसंगी प्रशालेतील सर्व क्रीडाशिक्षक व इतर सहकारी शिक्षक यांनी विशेष मेहनत घेतली. संस्थेचे चेअरमन डाॅ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षक व खेळाडुंना राष्ट्रीय क्रीडास्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.