loader
Breaking News
Breaking News
Foto

आचरा पिरावाडी येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा सामूहिक वाचन संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - श्री तरुण संघ दक्षिणवाडा आणि हनुमान मंदिर न्यास दक्षिणवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा पिरावाडी येथील श्री हनुमान मंदिरात हनुमान चालीसा सामूहिक वाचन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आतापर्यंत तीन श्रावणी शनिवार मिळून २८३५ एवढे दिवे भक्तांच्या क्लेशपरिहारार्थ श्री हनुमान चरणी लावण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी दिपप्रज्वलन श्री राम रक्षा पठण श्री हनुमान चालीसा सामूहिक वाचन, हनुमान स्तोत्र व मंत्र पठण करून श्रींची महाआरती करण्यात आली. तसेच पिरावाडी येथे श्रींची पालखी परिक्रमा संपन्न झाली. यावेळी बहुसंख्येने हनुमान भक्त उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री तरुणसंघ व श्री हनुमान मंदिर न्यास दक्षिणवाडा यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य तसेच सभासद यांनी परिश्रम घेतले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg