loader
Breaking News
Breaking News
Foto

आकाशवाणी सिंधुदुर्गवर कोकण संस्थेच्या १५ वर्षांच्या सामाजिक वाटचालीचा विशेष संवाद

सिंधुदुर्ग : सामाजिक बांधिलकी, लोकसहभाग आणि सेवाभावाच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांपासून विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या कोकण संस्थेच्या प्रेरणादायी वाटचालीचा आढावा आकाशवाणी सिंधुदुर्गच्या विशेष कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. या निमित्ताने कोकण संस्थेचे संस्थापक दयानंद कुबल यांच्याशी विशेष संवाद साधण्यात आला असून, संस्थेची स्थापना, सुरुवातीच्या काळातील आव्हाने, सामाजिक कार्याची प्रेरणा आणि गेल्या १५ वर्षांतील विविध उपक्रमांबाबत ते आपले अनुभव मांडणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकण संस्थेने गेल्या १५ वर्षांत पाणी, स्वच्छता व आरोग्य, शिक्षण, बालकल्याण, अनाथ व गरजू मुलांसाठी मदत, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, ग्रामीण विकास तसेच आपत्तीच्या काळातील मदतकार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केले आहे. ग्रामीण आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या मूलभूत गरजांवर काम करण्याबरोबरच शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना संधी उपलब्ध करून देणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणे, या उपक्रमांनाही संस्थेने प्राधान्य दिले आहे. पाणी व स्वच्छतेच्या क्षेत्रात ग्रामीण भागातील सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि जनजागृतीसाठी उपक्रम राबविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मार्गदर्शन आणि विविध प्रकारचे सहकार्य देण्याचे काम करण्यात आले. बालकल्याणाच्या माध्यमातून अनाथ, निराधार आणि गरजू मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. पर्यावरण क्षेत्रात वृक्षारोपण, संवर्धन आणि पर्यावरणाबाबत जनजागृतीच्या माध्यमातून समाजाचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

या १५ वर्षांच्या प्रवासात अनेक स्वयंसेवक, दाते, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग लाभला. ‘सेवेतून समाधान आणि सहभागातून परिवर्तन’ या भावनेतून सुरू झालेल्या या प्रवासातील संघर्ष, अनुभव, प्रेरणा आणि सामाजिक परिणाम या विशेष संवादातून श्रोत्यांना जाणून घेता येणार आहेत. ७ सप्टेंबर रोजी आकाशवाणी सिंधुदुर्गवर हा विशेष संवाद प्रसारित होणार असून, कोकण संस्थेच्या १५ वर्षांच्या सामाजिक वाटचालीची प्रेरणादायी कहाणी श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. १५ वर्षांचा प्रवास... सेवा, संघर्ष, लोकसहभाग आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी सर्वांनी नक्की ऐकावी असे आवाहन कोकण संस्थेकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg