loader
Breaking News
Breaking News
Foto

अमित खेडेकर यांची भाजपच्या खेड शहर चिटणीसपदी नियुक्ती

खेड : भारतीय जनता पक्षाची खेड शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने अमित अनंत खेडेकर यांची भाजपच्या खेड शहर चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या हस्ते अमित खेडेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. खेड शहरातील पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासोबतच भाजपची ध्येयधोरणे व विचारसरणी तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी अमित खेडेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी ओबीसी मोर्चा कोकण संपर्कप्रमुख संतोष नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, युवा मोची सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, रिक्षा चालक-मालक संघटना जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, खेड शहराध्यक्ष भालचंद्र साळवी, युवा मोर्चा शहराध्यक्ष स्वराज गांधी, सरचिटणीस विजय गुप्ता, रिक्षा संघटना तालुकाध्यक्ष राजन खेडेकर, शहर चिटणीस अनिकेत पवार, नंदू शिर्के, प्रथमेश सुर्वे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, तुषार पवार, सुयाश खेडेकर, प्रदीप भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg