देवगड (प्रतिनिधी) - देवगड स्पोर्ट्स क्लबची स्थापना ७ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आली असून, क्लबच्या पहिल्या स्पोर्टिंग इव्हेंट अंतर्गत देवगड तालुक्यातील पहिल्या फिशिंग टूर्नामेंटचे आयोजन ३० ऑगस्ट २०२४ रोजी मिठमुंबरी बीच येथे करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून दुपारी २ वाजता स्पर्धेची सांगता होऊन विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. देवगडच्या समुद्राशी आणि स्थानिक जीवनाशी मासेमारीचे अतूट नाते आहे. याच पार्श्वभूमीवर युवकांना समुद्राशी जोडणाऱ्या तसेच साहसी आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमाला सुरुवात करण्याच्या उद्देशाने देवगड स्पोर्ट्स क्लबने या फिशिंग टूर्नामेंटचे आयोजन केले आहे. कोकण, कर्नाटक आणि गोवा येथील सुमारे ३० नामांकित स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ११ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार ७७७ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३ हजार ३३३ रुपये अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ही प्रमुख पारितोषिके पकडलेल्या माशाच्या वजनावर आधारित असतील. याशिवाय दीड हजार रुपयांची तीन कन्सोलेशन पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धे दरम्यान सर्वात आधी मासा पकडणाऱ्या स्पर्धकाला मॅक्सिमम कॅचअंतर्गत विशेष पारितोषिक, तसेच दुपारी २ वाजेपर्यंत सर्वात शेवटी मासा पकडणाऱ्या स्पर्धकालाही कन्सोलेशन प्राईज देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वाधिक संख्येने मासे पकडणाऱ्या स्पर्धकालाही विशेष पारितोषिक देण्यात येणार असल्याचे स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष ललित चांदोस्कर यांनी सांगितले. देवगड स्पोर्ट्स क्लबचा हा केवळ स्पर्धेपुरता उपक्रम नसून, युवा वर्गाने अमली पदार्थ, दारू व इतर व्यसनांपासून दूर राहून क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, हा व्यापक संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे. युवकांना एकत्र आणून देवगडमध्ये चांगली स्पोर्टिंग कम्युनिटी निर्माण करण्याचा क्लबचा मानस आहे.
या उपक्रमामुळे कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत तसेच समुद्रातील जीवसृष्टीला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याचीही आयोजकांकडून विशेष काळजी घेतली जाणार असून पकडलेली मासळी लगेच नोंद घेऊन पाण्यात सोडली जाणार आहे. देवगड तालुक्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असलेल्या या फिशिंग टूर्नामेंटला तालुक्यातील नागरिकांनी तसेच विशेषतः युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन देवगड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ललित चांदोस्कर, सोहम पारकर, चिन्मय खानविलकर यांनी केले आहे.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.