loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना 'सुरक्षा राखी' बांधून दिला काळजीचा सल्ला

मालवण (प्रतिनिधी)मालवणच्या देऊळवाडा नाक्यावर उभे असलेले पोलीस... पोलीस पाहून वाहनचालकांच्या मनात निर्माण झालेली भीती... काही दुचाकीस्वारांना पोलिसांनी अडवत रस्त्याच्या कडेला घेतले... हेल्मेट कुठेय अशी विचारणा करताच दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली... आता आपल्यावर कारवाई होणार या विचारानेच दुचाकीस्वार भयभीत झाले... पोलिसांनी दुचाकीस्वारांना हात पुढे करायला सांगितले... अन त्याच क्षणी महिला पोलिसांनी त्यांच्या हातावर सुरक्षा राखी बांधत गुलाबही दिले आणि यापुढे हेल्मेट घालून सुरक्षित प्रवास करा, अन्यथा यापुढे कारवाई करू असा आपलूकीचा आणि काळजीचा सल्लाही दिला. या कृतीने दुचाकीस्वारांच्या जीवात जीव येऊन यापूढे हेल्मेट घालूनच दुचाकी चालवू असे वचन त्यांनी पोलिसांना दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने "सुरक्षा राखी" हा नाविन्यपूर्ण आणि प्रबोधनात्मक उपक्रम मालवण शहरात उत्साहात राबवण्यात आला. रस्ते सुरक्षेचा संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.मालवण शहरातील देऊळवाडा येथील नाक्यावर हे जनजागृती अभियान राबवण्यात आले. यावेळी नियमबाह्यपणे दुचाकी चालवणाऱ्या, म्हणजेच हेल्मेट न घातलेल्या वाहनचालकांना पोलिसांनी तसेच लोकप्रतिनिधींनी ‘सुरक्षा राखी’ बांधून सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून दिले. तर दुसरीकडे, दुचाकी चालवणाऱ्या महिलांना गुलाब पुष्प देऊन हेल्मेट वापराबाबत आपुलकीने जनजागृती करण्यात आली. जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित या उपक्रमात नगरसेविका नीना मुंबरकर यांनी स्वतः उपस्थित राहून वाहनचालकांना सुरक्षा राखी बांधली आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने नागरिकांना कडक इशाराही दिला आहे. उद्यापासून शहरात दोनचाकी वाहनचालकांसाठी हेल्मेट आणि चारचाकी वाहनचालकांसाठी सीटबेल्ट लावणे पूर्णपणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे वाहनचालक या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून थेट दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

या जनजागृती मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक पंडीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, जितेंद्र पेडणेकर, सुरज रेडकर, सुप्रिया पवार, रंजू डोये, संकेत तांडेल, राजाराम तेरेखोलकर, शशिशेखर प्रभू, आरती खोबरेकर, सोनाली पाटकर, भक्ती शिवलकर, ज्योस्त्ना पोखरे, दीपक गावडे, धनंजय निवतकर, गणेश माने तसेच जिल्हा वाहतूक पोलीस कर्मचारी महेंद्र देऊलकर, मंचकराव शिरडे आणि नागेश मालवे आदी अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नगरसेविका नीना मुंबरकर यांनीही उपस्थित राहून पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg