loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंढे ग्रामसभेत तलाठी समाधान सरगर यांच्या अभिनंदनाचा ठराव

दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील कोंढे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तलाठी समाधान सरगर यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तलाठी सजा करंजाळीचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नागरिकांना दिलेली महसुली सेवा, उत्पन्न दाखले देताना केलेले सहकार्य तसेच नागरिकांशी ठेवलेली सौजन्यपूर्ण वागणूक याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१५ ऑगस्ट रोजी होणारी तहकूब ग्रामसभा कोंढे ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आली. यावेळी माजी समाजकल्याण सभापती दिलीप कासारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, माजी सरपंच मारुती चिपळूणकर यांनी तलाठी सरगर यांच्या कामाचे कौतुक केले. पत्रकार तथा कोंढे गावचे माजी सरपंच प्रवीण शिंदे यांनीही सरगर यांचे अभिनंदन केले. सिद्धार्थ कासारे यांनी अभिनंदनाच्या ठरावाला अनुमोदन दिल्यानंतर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी विजय शिगवण होते. यावेळी प्रशासक प्राप्ती वाजे, दिपाली शिगवण, मिताली कासारे, कृष्णा भुवड, अनंत पाटील, पोलीस पाटील शुभम घोडेराव यांच्यासह ग्रामस्थ, महिला व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg