loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्तव्यदक्ष हातांना स्नेहाचा धागा! ‘युवा प्रेरणा कट्टा’तर्फे रक्षाबंधन उत्साहात

दापोली (सागर गोवळे) - आपल्या संरक्षणासाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे जवान, अहोरात्र जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर तैनात असणारे पोलीस बांधव आणि रुग्णांना जीवदान देणारे वैद्यकीय कर्मचारी... समाजाच्या या खर्‍या ढाल-तलवारींसाठी ‘युवा प्रेरणा कट्टा’च्या तरुणाईने यंदाचा रक्षाबंधन सण अत्यंत अनोख्या आणि भावूक वातावरणात साजरा केला. कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान, कोळथरे संचलित ‘युवा प्रेरणा कट्टा’च्या वतीने दापोली पोलीस ठाणे आणि दापोली उपजिल्हा रुग्णालयात जाऊन येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना राख्या बांधत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रेरणा कट्‌ट्याच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि तरुण पिढीच्या या संवेदनशील उपक्रमाचे दापोली शहर व परिसरातून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg