loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबस्ते गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी मज्जीद नेवरेकर यांची फेरनिवड

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी मज्जीद नेवरेकर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. यापूर्वी सुमारे अकरा वर्षे त्यांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद भूषविले असून, त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी पुन्हा त्यांच्यावरच विश्वास व्यक्त केला आहे. मज्जीद नेवरेकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदावर कार्यरत असून, विविध सामाजिक संघटनांमध्येही ते सक्रिय आहेत. गावातील सामाजिक सलोखा, विविध प्रश्नांवर मध्यस्थी आणि ग्रामस्थांमध्ये समन्वय राखण्याच्या त्यांच्या कार्यामुळे त्यांच्यावर पुन्हा जबाबदारी सोपविण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. फेरनिवडीनंतर ग्रामस्थांकडून मज्जीद नेवरेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg