रत्नागिरी : सामाजिक बांधिलकी आणि आपलेपणाची भावना जोपासत रत्नागिरी जिल्हा व रत्नागिरी तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने यंदाचे रक्षाबंधन अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात आले. समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारी पोलीस यंत्रणा आणि आधाराची गरज असलेल्या वृद्धाश्रमातील बंधू यांच्यासोबत हा सण साजरा करत असोसिएशनने एक आदर्श उदाहरण समोर ठेवले आहे.या वेळी वाहतूक पोलीस शाखेचे उपनिरीक्षक श्री संजय कांबळे ,सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री अरविंद कांबळे. सहा. पोलीस उपनिरीक्षक भार्गव घाग ,पोलीस हवालदार सुशांत पवार.पोलीस हवालदार राजेश देवरुखकर , पोलीस हवालदार किशोर वाघाटे ,पोलीस हवालदार निलेश कांबळे तर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे , सहा.पो.उप नि. राजेंद्र सावंत, हवालदार बाळू पालकर रणजीत जाधव, राहुल पावसकर, शरद कांबळे, प्रतीक कांबळे व पोलीस बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय या कार्यक्रमाचा दुसरा भावुक टप्पा माहेर वृद्धाश्रम, रत्नागिरी येथे पार पडला. वृद्धाश्रमातील अनाथवृद्ध बंधूना राखी बांधून त्यांच्याशी संवाद साधत असोसिएशनच्या सदस्यांनी भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण अधिक घट्ट केली. वृद्धाश्रमातील वृद्ध बंधूच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावर आलेले हसू उपस्थितांचे डोळे पाणावणारे होते. आपल्या पाठीशी कोणीतरी आपली हक्काची माणसे उभी आहेत, ही भावना यानिमित्ताने त्यांना मिळाली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या वृद्ध बंधूचे तोंड गोड करत सोबत सर्व छायाचित्रकारानी एकत्र अल्पोपहार केला
या सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सर्वच स्तरातून रत्नागिरी जिल्हा व तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण टिपणारे हे छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर, खऱ्या अर्थाने समाजाच्या आयुष्यातही आनंदाचे आणि आपलेपणाचे रंग भरत आहेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे जिल्हा कार्याध्यक्ष गुरु चौगुले, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, मंथन मालगुंडकर,पदाधिकारी संदेश पवार, सचिन शिंदे, अजीम वस्ता व सर्व पदाधिकारी व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.