loader
Breaking News
Breaking News
Foto

आसुद सोसायटीचे सहकार विभागाच्या सह सचिवांकडून कौतुक

दापोली (प्रतिनिधी) : सहकारात स्थैर्य आणि विश्वास महत्वाचा असतो. याच विश्वासाच्या पाठबळावर आसुद ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने सभासदांकडून ठेवी संकलन करण्याचा धाडसी निर्णय घेतला, खत वाटपाचे उद्दिष्टही लिलया पूर्ण केले, वाहतूक व्यवसायासह पर्यटन व्यवसाय करत त्यात त्यांनी आपला चांगला जम बसवून सफलताही मिळवली आहे. हे चांगल्या सहकारातील कामकाजाचे लक्षण असल्याच्या कौतुकाचे गौरवोद्गार काढत आसुद सोसायटीचे चेअरमन संचालक मंडळ आणि सचिव यांच्या कामाचे सह सचिव संतोष पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील आसुद विकास सोसायटी तालुका, जिल्हा, कोकण विभागासह राज्यपातळीवर सहकार क्षेत्रातील विविध प्रकारचे मानाचे आणि प्रतिष्ठेचे पुरस्कार गेले अनेक वर्षे मिळवित आहे. सहकारात कोकणातील या शेतीविषयक सोसायटीचे नाव आहे. संपूर्ण संगणकीकृत कारभार असलेल्या या सोसायटीने आपल्या सभासदांची मने जिंकून त्यांचा पारदर्शक कारभाराने विश्वास संपादन केला आहे. अशा सोसायटीच्या एकुणच कामकाजाची माहिती घेण्यासाठी मुंबई मंत्रालयीन अधिनस्त सहकार विभागातील सह सचिव संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष आसुद येथे येऊन आसुद सोसायटीच्या कामकाजाची त्यांच्या योजनांची माहिती घेतली.

टाईम्स स्पेशल

त्यांनी एकुणच सोसायटीच्या कामकाजाचे समाधान व्यक्त केले तसेच काही सुचनाही केल्या या सुचनेमध्ये त्यांनी आंबा उत्पादक सभासदांचा आंबा पॅकिंग करून पूणे मुंबई ठाणे अशा ठिकाणी विक्री करण्यासाठी नियोजन करावे त्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,पूणे सहकारी गृहनिर्माण संस्था यांचे सहकार्य घेता येईल, असे सुचित करत त्यांनी संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल संपूर्ण संचालक मंडळ सचिव आणि कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यातही ते विसरले नाहीत. यावेळी उप निबंधक श्री. कुलकर्णी, दापोली तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधक अनिता बटवाल, वेदा मयेकर आदी सहकारातील अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg