loader
Breaking News
Breaking News
Foto

भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे शेतकर्‍यांना मार्गदर्शन मात्र कर्मचारी व संशोधकांचा अभाव

रत्नागिरी : येथील भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र गेली अनेक वर्ष नारळावर संशोधन करीत असून, लागवड, रोपे, नारळ विक्री यामाध्यमातून गतवर्षी एक कोटी २० लाखाचे उत्पन्न या केंद्राला प्राप्त झाले आहे. नारळ लागवडीबरोबरच मसाला पिकांवरील संशोधन आणि लागवडीसाठी या केंद्रातून मोठ्याप्रमाणात शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत असले तरी कर्मचारी व संशोधकांचा अभावाचा फटका या केंद्राला बसत आहे. शहरालगतच्या भाट्ये प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामध्ये वाणनिर्मितीपासून ते प्रक्रियेपर्यतचे संशोधन याठिकाणी सुरु असते. नारळासह मसाला पिके, कलमे यांच्यासह तंत्रज्ञान पाहण्यासाठीही याठिकाणी सर्वाना अनुभवण्यासाठी उपलब्ध असते. दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठांतर्गत हे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र कार्यरत आहे. केंद्र सरकारने १९५५मध्ये हे केंद्र सुरु केले आणि १९६८ मध्ये महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात जवळपास साडेचार हजारहून अधिक नारळाची २७ हून अधिक जातींच्या नारळांची लागवडीचा संग्रह करण्यात आलेली आहे. कोकण भाट्ये कोकोनट हायब्रीड १ व प्रताप हे नारळाचे संकरीत वाणही विकसित करण्यात आले आहे. याठिकाणी अंतर्गत पिकांमध्ये मसाल्यांची लागवड ही करण्यात आलेली आहे. या संशोधन केंद्राकडून कोकणासह राज्यात बाणवली, लक्षद्वीप ऑर्डीनरी, फिलिपाईन्स, फिजी, केरा संकरा, चंद्रसंकरा आणि गोदावरी गंगा या सातजातींची विशेष शिफारशी केल्या जातात. या केंद्रातून दरवर्षी नारळ विक्री, नारळांची रोपे विक्री, नारळ बियाणे, मसाले या माध्यमातून जवळपास एक कोटी २० लाखाहून अधिकच उत्पन्न प्राप्त झाले आहे. नुकत्याच मे महिन्यामध्ये आलेल्या वादळी वार्यामध्ये या नारळ संशोधन केंद्रालाही फटका बसून त्यात काही झाडांचे नुकसान झाले.

टाईम्स स्पेशल

नारळ संशोधन केंद्रामध्ये सध्या ११ मजूर असून त्यातील तीन मजूर कायमस्वरुपी असून उर्वरीत रिक्त आहेत. तर संशोधक आणि कार्यालयात मिळून १७ पदे मंजूर असून त्याठिकाणीही हाताच्या बोटावर मोजता येथील एवढेच कर्मचारी असल्याने कर्मचार्यांकडून काम करुन घेताना येथील प्रशासनिक अधिकार्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याठिकाणी अनेक पदे रिक्त आहेत. विशेषत: मजूर मिळणे कठीण जाते. शासनाकडून कंत्राटी कर्मचार्याला चारशे नऊ रुपये मजुरी मिळते. मात्र बाहेर काम केल्यास पाचशे ते सातशे रुपये मजुरी दिवसा मिळत असल्याने, केंद्रात काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. रिक्त जागा भरण्याबाबत वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg