देवगड (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शेतकरी दिनाचे औचित्य साधून हिंदळे नं. १ जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना आंबा बागायतीची प्रत्यक्ष माहिती देत खुंटी कलम करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विशेष म्हणजे केवळ प्रात्यक्षिक पाहण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी स्वतः खुंटी कलम करून शेतीतील या पारंपरिक तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शेती, बागायती आणि स्थानिक पिकांची माहिती मिळावी, त्यातून शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षक स्वतः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रशिक्षण देत असल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.
आज माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहरी भागाकडे वळतात. पुढे नोकरीच्या निमित्ताने मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये स्थायिक होताना आपल्या गावातील पारंपरिक शेती आणि बागायतीकडे त्यांचे दुर्लक्ष होते. काही वेळा या प्रक्रियेत पिढ्यान्पिढ्या जपलेल्या जमिनी विकण्याची वेळही येते. त्यामुळे नव्या पिढीची शेतीशी तुटत चाललेली नाळ पुन्हा जोडण्यासाठी शालेय स्तरापासूनच शेतीचे संस्कार आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. याच विचारातून हिंदळे नं. १ शाळेने विद्यार्थ्यांना आंबा बागायती, कलम पद्धती आणि शेतीतील प्रत्यक्ष कौशल्यांची ओळख करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पुस्तकातील धड्यांसोबतच मातीशी नाते जोडणारे आणि भविष्यात उपयोगी पडणारे असे अनुभवाधारित शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे.
शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून आपल्या गावच्या अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा आधार आहे. ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासून रुजविण्याचे काम हिंदळे नं. १ शाळेच्या माध्यमातून होत असून, ग्रामीण शिक्षणासाठी हा निश्चितच अनुकरणीय आणि कौतुकास्पद उपक्रम ठरत आहे. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना केंद्र शाळा हिंदळे नंबर 1 केंद्र प्रमुख जानवी लोके, मुख्याध्यापक रमेश राठोड, सहाय्यक शिक्षिका आदिती राणे, प्राप्ती राणे, अमित खामकर, शाळा व्यवस्थापन समिती तसेच मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रशिक्षण देणाऱ्या अविनाश राणे सरांचे विशेष कौतुक करत हिंदळे नं. १ शाळेच्या या उपक्रमाचे सरपंच मकरंद शिंदे यांनी मनापासून कौतुक केले. सर्व शिक्षक वृंदांचे आभार व्यक्त केले.

















































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.