संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी सागर देसाई यांची पुनश्च एकदा सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीसह सागर देसाई यांनी अध्यक्षपदाची 'डबल हॅटट्रिक' साधत एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. नुकतीच कोंडये ग्रामपंचायत सभागृहात ग्रामसभा पार पडली. या सभेत तंटामुक्त समितीच्या नवीन अध्यक्षपदाची प्रक्रिया पार पडली. यावेळी माजी सरपंच सुरेश दसम यांनी सागर देसाई यांच्या नावाचा प्रस्ताव अध्यक्षपदासाठी मांडला. या प्रस्तावाला माजी सरपंच पूनम महेश देसाई यांनी खंबीर अनुमोदन दिले. सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी, लोकप्रतिनिधींनी आणि मान्यवरांनी टाळ्यांच्या गजर करत या प्रस्तावाला एकमुखाने पाठिंबा दिला आणि देसाई यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
या सभेला महेश देसाई, माजी सरपंच पूनम महेश देसाई, माजी सरपंच सुरेश दसम, माजी सरपंच राजाराम पडये, दीपक शिंदे आदी ग्रामस्थ तसेच ग्रामसेवक उपस्थित होते. सागर देसाई यांनी यापूर्वी ५ वेळा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची धुरा अत्यंत समर्थपणे आणि यशस्वीरीत्या सांभाळली आहे. या ६ व्या निवडीमुळे त्यांनी अध्यक्षपदाची 'डबल हॅटट्रिक' पूर्ण केली आहे. गावात निर्माण होणारे छोटे-मोठे वाद, कौटुंबिक किंवा जमिनीचे प्रश्न न्यायालयात न नेता ग्रामपंचायत पातळीवरच सामोपचाराने आणि निष्पक्षपणे मिटवण्यात त्यांचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे. गावात सामाजिक सलोखा आणि ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊनच ग्रामस्थांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर हा विश्वास दाखवला आहे.
सागर देसाई यांच्या या ऐतिहासिक 'डबल हॅटट्रिक' निवडीबद्दल संपूर्ण कोंडये गावातून तसेच खाडिभाग दशक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आगामी कार्यकाळातही कोंडये गाव तंटामुक्त आणि शांतताप्रिय ठेवण्यासाठी त्यांच्या हातून असेच उत्कृष्ट कार्य घडो, या शब्दांत उपस्थित लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि मित्रपरिवारा कडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

















































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.