loader
Breaking News
Breaking News
Foto

रामचंद्र आखाडे यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

खेड : ग्रामपंचायत घेरारसाळगड येथे दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत सन २०२६–२७ या कालावधीसाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बाबू आखाडे यांची एकमताने निवड करण्यात आली. रामचंद्र बाबू आखाडे हे कोकण धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबईचे कार्याध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान असून, मनमिळाऊ स्वभाव व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कार्यपद्धती यामुळे त्यांच्या निवडीचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या नेतृत्वाखाली गावातील सलोखा, एकोपा, शांतता आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आखाडे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. “माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. तंटामुक्त समितीतील सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन गावाच्या हितासाठी तसेच गावातील शांतता व एकोपा कायम राखण्यासाठी कार्य करणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

या निवडीबद्दल कोकण धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबई तसेच ग्रामस्थांच्या वतीने रामचंद्र बाबू आखाडे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg