loader
Breaking News
Breaking News
Foto

मोकाट गुरंरं देतायत अपघाताला आमंत्रण

दापोली (प्रतिनिधी) : दापोली शहरातील महत्त्वांच्या प्रमुख रस्त्यांवर ठाण मांडून बसत असलेल्या मोकाट गुरांमुळे वाहतूक तर विस्कळीत होत आहेच शिवाय या मोकाट गुरांच्या अडथळ्यामुळे सुरळीत वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत असून ही ठाण मांडून रस्त्यावर बसलेली गुरे अपघाताला आमंत्रणच देत आहेत. मात्र ही समस्या सोडविण्यासाठी कोणतेही स्थानिक प्रशासन पुढे येत नाही ही खरी शोकांतिका आहे. त्यामुळे सुरळीत वाहतुकीला चांगलाच धोका निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली शहरातून खेड, मंडणगड, दाभोळ, हर्णे, बुरोंडी, ताडील, कळंबट, बांधतिवरे, वेळवी, कोळबांद्रे, कुडावले आदी विविध मार्गांकडे आणि वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे जाणारे रस्ते आहेत. शहरातील या वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर सर्वच ठिकाणी अगदी दररोजच रस्त्याच्या मधोमध मोकाट गुरे ठाण मांडून बसलेली असतात. त्यात प्रामुख्याने एस.टी. स्टँड, केळसकर नाका, कृषि महाविद्यालय, हर्णे मार्गावर आणि बाजारपेठेत वर्दळीच्या ठिकाणी गुरे ठाण मांडून बसत असल्याने त्याचा मोठा त्रास शहरातील रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना होत आहे.

टाईम्स स्पेशल

यातील अनेक गुरे ही मारकुटी तर काही गुरे अचानक उधळत असल्यामुळे अनेकदा अनेक जणांच्या अपघाताच्या घटना होऊन ते जखमी झालेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे याचा सारासार विचार करून सुरळीत आणि सुरक्षित प्रवासासाठी या मोकाट गुरांचा स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने जनहिताचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg