loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री देव काळभैरव, भैरी भवानी, जोगेश्वरी मंदिर कसबा येथे श्रावणी नैवेद्य महाप्रसादाचे आयोजन

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील श्री देव काळभैरव, भैरी भवानी, जोगेश्वरी मंदिर कसबा येथे गेली चार ते पाच वर्षे श्रावणमासानिमित्त श्रावणी नैवेद्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे रविवार रोजी आयोजन करून कार्यक्रम संपन्न झाला. याचा मुख्य हेतू भाविकांनी मंदिरात यावे, त्यानिमित्त एकत्र येण्याचा योग येतो. नवनवीन ओळखी होऊन, कोकणातील व देव देवतांच्या मंदिरातील महाप्रसाद, अन्नदान व देव सेवा यांची प्रथा अद्यावत चालू राहून आपली संस्कृती जतन व्हावी, अशा प्रमुख हेतूने या नैवेद्य महाप्रसादाचे आयोजन या मंदिर देवस्थानच्या वतीने करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या नैवेद्य महाप्रसादामध्ये उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पावसाळ्यातील म्हणजे श्रावणातील आजूबाजूच्या परिसरात तयार होणाऱ्या रानभाज्या टाकळा, अळू, भारंगी, अशा अनेक प्रकारच्या रानभाज्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून मोफत प्राप्त होणाऱ्या रानभाज्यांचे मानवी आरोग्यास उपयोग व महत्त्व अबाधित राखण्याचा देवस्थानच्या वतीने प्रयत्न केला जात आहे. सदरचा कार्यक्रम मंदिरामध्ये चालू असताना याप्रसंगी कर्णेश्वर व संगमेश्वर मंदिरे वारसा सहलीतील मातब्बर मंडळींच्या भेटीचा योगायोग जुळून आला. यामध्ये आयोजक असलेले अजित राणे तसेच मार्गदर्शक म्हणून असलेले साईली पलांडे दातार (भारत विद्या तज्ञ, करण तज्ञ, आणि इतिहास संशोधक) यांनी शिवकालीन मंदिरे, बांधकाम, साहित्य, मज़बूत, टिकाऊ यावर व चिपळूण येथील गौरव लवेकर (नाणी संग्राहक) यांनी दुर्मिळ नाणी त्यांनी स्वतः जमा व जतन करून ठेवलेली सुमारे शंभर ते दीडशे जुनी नाणी प्रदर्शन स्वरूपात दाखवून स्वतः मार्गदर्शन केले व माहिती दिली. यावेळी चिपळूण व देवरुख येथील सुमारे ४०/५० शालेय विद्यार्थी मंदिरात मार्गदर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या मंदिरालगत असलेल्या सोमेश्वर, काशी विश्वेश्वर ही मंदिरे दुर्गवीर प्रतिष्ठान अंतर्गत गेली दहा-बारा वर्षे स्वच्छता व सफाई करण्यात येत असल्याने या प्रतिष्ठानचे उपस्थित असणाऱ्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला. व त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमासाठी चिपळूण, रत्नागिरी, लांजा येथून अनेक जण आवडीने वारसा जाणून घेण्यासाठी व पाहण्यासाठी उपस्थित होते. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थ भक्तजन मंडळी यांनी या नैवेद्य महाप्रसादाचा लाभ घेतला. कर्णेश्वर व संगमेश्वर मंदिरे वारसा सहलीतील मार्गदर्शक साईली पलांडे. दातार, गौरव लवेकर‌ व‌ सहलीतील सहभागी मंडळींचे देवस्थानच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg