loader
Breaking News
Breaking News
Foto

तुरळ ग्रामपंचायतीच्या तहकूब ग्रामसभेत वसंत कदम यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - तुरळ ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सरपंच रामचंद्र हरेकर यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ग्रामसभेच्या अजेंड्यावर विविध महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची निवड हा प्रमुख विषय होता. उपस्थित ग्रामस्थांच्या सहमतीने वसंत गणपत कदम यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावातील तंटे व वाद-विवाद सामोपचाराने सोडवून गावात शांतता, सलोखा आणि सामाजिक एकोपा कायम राखण्यासाठी तंटामुक्ती समितीची भूमिका महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे वसंत कदम यांच्या निवडीचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. ग्रामसभेदरम्यान अजेंड्यावरील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण ग्रामसभेचे कामकाज शांततापूर्ण वातावरणात व सुरळीतपणे पार पडण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg