loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने उर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेड, (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने हमीद घनसार यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, खेड येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, छत्र्या, पेन, पाऊच आदी शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर या साहित्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष ला. अविनाश दळवी, सचिव ला. उत्तम कांबळे, माजी अध्यक्ष ला. रोहन विचारे, ला. हानिफ घनसार, ला. परेश चिखले, ला. प्रतीक गिल्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नगरसेवक आरिफ मुल्लाजी, नगरसेविका रेश्मा खतीब, उपशहर प्रमुख जावेद कौचाली, रिझवान भाई यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य व समाजसेवा या क्षेत्रात सातत्याने योगदान दिले जात असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी क्लबकडून अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg