खेड (प्रतिनिधी) - तालुक्यातील आंबये गावात दीडशे वर्षांपासून ग्रामस्थांच्या वापरात असलेल्या सार्वजनिक विहिरीवरून मालकी हक्काचा वाद निर्माण झाला आहे. एका ग्रामस्थाकडून या विहिरीवर वैयक्तिक मालकी हक्क सांगितला जात असून, ग्रामस्थांना विहिरीतील पाणी घेण्यास मज्जाव केला जात असल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला आहे. यावेळी सकपाळवाडी आणि सुतारवाडी परिसरातील नागरिकांच्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तालुका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी सोडवावा, अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, आंबये गावातील संबंधित विहीर सुमारे दीडशे वर्षांपासून सार्वजनिक वापरात आहे. सकपाळवाडी, सुतारवाडी तसेच आजूबाजूच्या वाड्यांमधील अनेक कुटुंबे या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. विशेषत: या परिसरात वयोवृद्ध, आजारी आणि दिव्यांग नागरिकांची संख्या मोठी असून, पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहे.
दरम्यान, हनुमंत सकपाळ यांनी या विहिरीवर स्वतःचा मालकी हक्क असल्याचा दावा केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विहिरीवर त्यांच्या वडिलांच्या नावाची पाटी लावण्यात आल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे सार्वजनिक वापरातील विहिरीच्या मालकीवरून गावात वाद निर्माण झाला आहे. सदर विहिरीबाबत महसूल विभागाच्या चौदा नंबरच्या पाणीपुरवठा साधनांच्या नोंदवहीत विहीर सरकारी असल्याची नोंद असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे एका बाजूला सरकारी नोंदीत विहीर सार्वजनिक अथवा सरकारी असल्याचे नमूद असल्याचे सांगितले जात असताना दुसर्या बाजूला वैयक्तिक मालकी हक्क सांगितला जात असल्याने या प्रकरणाची अधिकृत चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे.
या वादामुळे विहिरीच्या पाण्याचा वापर करण्यावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेच्या स्रोतावरून निर्माण झालेला हा वाद प्रशासनाने तातडीने सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणी ग्रामस्थांनी महसूल विभाग, पोलीस प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडे धाव घेतली असून, संबंधित विहिरीची मालकी, महसूल नोंदी आणि प्रत्यक्ष वापर यांची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

















































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.