loader
Breaking News
Breaking News
Foto

कॉकरोच जनता पार्टी ५ सप्टेंबरला आंदोलन करणार नाही, ४ राज्यातील विद्यार्थ्यांविरोधात दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश

नवी दिल्ली - पेपर लीक विरोधात जंतर मंतर येथे आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर दाखल प्राथमिक माहिती अहवाल रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे सहसंयोजक सौरव दास यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर सांगितले की, ५ सप्टेंबरला प्रस्तावित इंडिया गेट मार्च आता होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद १४२ अंतर्गत विशेष अधिकारांतर्गत आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात दाखल एफआयआ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाची दखल घेत, दिल्ली, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील विद्यार्थ्यांविरोधातील आंदोलन संदर्भातील गुन्हे रद्द करण्यात आले आहेत. मात्र दिल्ली पोलिसांनी २८७३लोकांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे कायम राहतील. ज्यामध्ये आंदोलकांनी केलेली तोडफोड याचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की, पेपर लीक विरोधात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी झालेल्या आंदोलनाविरोधात आता कोणतेही गुन्हे दाखल होणार नाहीत.

टाईम्स स्पेशल

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यामूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. सौरव दास यांनी मार्च मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर सीजेआयने या पावलाचे विशेष कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg