संगलट (प्रतिनिधी) - उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या अंगावरच स्लॅबचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना आज मंगळवार दि. १ सप्टेंबर पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सर्जिकल वॉर्डमध्ये घडलेल्या या घटनेत सुनील यशवंत अवेरे (वय ४४, रा. देवखोल, श्रीवर्धन) हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेने जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुनील अवेरे यांचा ३० ऑगस्ट रोजी दुचाकी अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या खांद्याला फ्रॅक्चर झाल्याने त्यांना उपचारासाठी अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते. मात्र, पहाटेच्या सुमारास अवेरे हे सर्जिकल वॉर्डमध्ये झोपेत असताना अचानक त्यांच्या अंगावर स्लॅबचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे वॉर्डमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या अंगावरच स्लॅब कोसळल्याने इमारतीच्या देखभालीचा आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तथा शेकाप आरोग्य सेलचे तालुका अध्यक्ष सागर पेरेकर यांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमी रुग्णाची भेट घेऊन प्रकृतीची माहिती घेतली. तसेच रुग्णांच्या सुरक्षेबाबत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अलिबाग नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती अनिल चोपडा यांनीही या प्रकाराबाबत माहिती घेत रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने घेतला. रुग्णालयातील इमारतीची स्थिती, देखभाल आणि संभाव्य धोकादायक भागांची तपासणी तातडीने होणे आवश्यक असल्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
रुग्णालयातील इमारतीची नियमित देखभाल केली जाते का? धोकादायक भागांची पाहणी करण्यात आली होती का? रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने कोणती खबरदारी घेतली, असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. रुग्णालयात उपचारासाठी येणार्या नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. स्लॅब कोसळण्याच्या घटनेची सखोल चौकशी करून संपूर्ण इमारतीची संरचनात्मक तपासणी करावी, धोकादायक भागांची तातडीने दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या अंगावरच स्लॅब कोसळत असेल, तर रुग्णांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल या घटनेनंतर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

















































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.