loader
Breaking News
Breaking News
Foto

आय.सी.एस. मध्ये ग्रंथालय परिचर विजय हुमणे यांच्या सेवापूर्तीचा सोहळा उत्साहात साजरा

खेड - येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील परिचर पदावर कार्यरत असणारे विजय रामचंद्र हुमणे हे नियत वयोमानानुसार एकूण 36 वर्षे सेवा करून दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल सहजीवन शिक्षण संस्था, आय.सी.एस. महाविद्यालयातर्फे त्यांच्या सेवापूर्तीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनीही सहभागी होत त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या. सुरुवातीस उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते तसेच विजय हुमणे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने त्याचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन त्याचा सत्कार केला. त्यावेळी त्यांच्या पत्नी हुमणे यांचाही सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विजय हुमणे यांचे नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडूनही त्यांना पुष्प्गुच्छ देण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य मोहिते याने त्यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. अमोल कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी अधीक्षक एस. एम. सकपाळ यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. ग्रंथपाल डॉ.राजेश राजम यांनी ग्रंथालयातील हुमणे यांचे काम व त्यांच्या कामाची पद्धत यावर प्रकाश टाकत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच्या मित्रपरिवारातील अनेकांनी एक व्यक्ती म्हणून त्यांचा प्रवास सांगून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ.थोरात यांनी हुमणे यांच्याशी निगडीत अनेक आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या पहिल्या दिवसापासून त्यांचे असणारे योगदान त्यांनी सांगितले. नगरसेवक निकेतन पाटणे यांनीही यावेळी हुमणे यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. संस्थेचे संचालक उत्तमकुमार जैन यांनी हुमणे यांच्या स्वभावातील बारकावे सांगत त्यांच्या कामाची एकनिष्ठता अधोरेखीत करत आपण त्यांचे एक मित्र म्हणून या कार्यक्रमास उपस्थित असल्याचे सांगितले.

टाईम्स स्पेशल

माजी प्राचार्य डॉ. जी. बी. सारंग यांनी हुमणे यांच्या समवेत काम करतानाचे काही अनुभव सांगितले, तसेच सेवानिवृत्त प्रा. डॉ. विद्या शिंदे यांनी हुमणे यांना भेटवस्तू देऊन आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा गौरव केला. प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी यांनी हुमणे यांच्या स्वभावाचे काही पैलू सांगून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना विजय हुमणे यांनी त्यांच्या कार्यकाळात असणाऱ्या सर्व प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले, तसेच आपण ईमाने इतबारे सेवा करण्याचा प्रयत्न केला असल्याचे नमूद केले. याप्रसंगी व्यासपीठावर नगरसेवक निकेतन पाटणे, परिमल चिखले तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी.एम.शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे ए आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. आर. एस. भालेराव यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. एम. के. केळकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg