loader
Breaking News
Breaking News
Foto

एसटी आगारातून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी १ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य: एसटी महामंडळाचे परिपत्रक जारी

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटी बसने प्रवास करणार्‍या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला लाभार्थ्यांसाठी १ सप्टेंबर २०२६ पासून एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड) कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. शासकीय निर्देशानुसार एसटी महामंडळाद्वारे सवलतधारक आणि विनासवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी कार्ड वितरित केले जात आहेत. हे कार्ड नोंदणी आणि वितरणाची जबाबदारी ’मे. ईबिक्स टेक्नॉलॉजीस लि.’ या संस्थेकडे सोपवण्यात आली असून, त्यासाठी एसटी आगार, बसस्थानके तसेच आगाराबाहेर अधिकृत एजंट्सची नियुक्ती करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

१ सप्टेंबर २०२६ पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मिळणारी प्रवास भाडे सवलत केवळ एनसीएमसी कार्डद्वारेच दिली जाईल. एसटी वाहकांमार्फत या एनसीएमसी कार्डचे टॉप-अप केले जाणार आहे. सध्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांची नोंदणी सुरू असून, भविष्यात इतर सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल. याबाबतची मानक कार्यप्रणाली (एसओपी) आधीच पाठवण्यात आली असून, सर्व आगार व्यवस्थापक, चालक व वाहक यांना या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg