loader
Breaking News
Breaking News
Foto

अमित ठाकरेंसह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पीएम मोदींची फ्रेम कार्यकर्त्यांकडून हटविण्याचा प्रयत्न

पुणे - शहरातील शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय आवारात बेकायदा प्रवेश करुन गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख यांच्यासह २५ जणांविरुद्ध पोलिसांनी चतुश्रृंगी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्राचार्य डॉ. राजेंद्र काशिनाथ पाटील यांनी फिर्याद दिल्यावरुन हा गुन्हा दाखल केला आहे. ‘अमित ठाकरे हे २० ते २५ पदाधिकाऱ्यांसह सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात शिरले. त्यांनी डाॅ. राजेंद्र पाटील यांच्या कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयात लावलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर हटविली आणि पाटील आणि सहकाऱ्यांना धमकावले,’ असा आरोप डाॅ. पाटील यांनी फिर्यादीत केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आवारात घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे डाॅ. पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. मनसेच्या आंदोलनानंतर उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालायस भेट दिली. संस्थेच्या आवारातील अर्धवट बांधकामांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी प्राचार्यांची भेट घेतली.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर उच्च तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दुपारी संस्थेस भेट दिली. प्राचार्यांकडे चौकशी केली. आवारातील पायाभूत सुविधा आणि बांधकामबाबातची माहिती त्यांनी घेतली. पाटील यांनी संबंधित बांधकाम ठेकेदाराशी संपर्क साधून बांधकाम संथगतीने सुरू असल्याबाबत विचारणा केली. प्राचार्यांच्या कार्यालयातील पंतप्रधान मोदी यांची तसबीर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हटविली. भाजप कार्यकर्त्यांनी संस्थेस भेट देऊन मोदी यांची तसबीर पुन्हा तेथे लावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg