loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुक्यातील वाद्य कारागिरांची सुरू झाली लगबग

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - कोकणात गणेशोत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. मुंबई, पूणे, गोवा, कोल्हापूर आदि विविध शहरांमध्ये कामानिमित्त गेलेले चाकरमानी गावाकडे येत असतात. गणेशोत्सवाला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. संगमेश्वरातील वाद्य कारागिर वाद्यांना नवीन साज चढविण्यासाठी सज्ज झाले आहेत ते कामात गुंग झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव काळात कोकणात भजन, किर्तन, जाकडी, टिपऱ्या आरत्या असे पारंपारिक कार्यक्रम प्रत्येक व्यक्तीच्या घरोघरी सुरु असतात. काही ठिकाणी भजनाचे डबलबारी सामने तर जाकडीतील शक्ती तुरीवालेचे जंगी सामने पाहयला मिळते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे प्रत्येक भजन जाखडी मंडळे आपल्याकडील वाद्य साहित्यास उत्तम नाव यावा व कार्यक्रमाची रंगत वाढावी या उद्देशाने तबला, ढोलकी आदि वाद्ये खरेदीसाठी किंवा त्यावर नवा साज चढविण्यासाठी नजीकच्या वाद्य कारागिरांकडे गर्दी करीत आहेत. त्यामुळे वाद्य कारागिरांची मोठी धावपळ होत आहे. ही धावपळ होऊ नये यासाठी एक महिना अगोदरच हे वाद्य कारागिर आपल्या कामाला जोर धरतात. या वर्षीचा गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात येत असून तालुक्यातील संगमेश्वर येथील तबला ढोलकी मदंगाची खोडे वाद्य आदिच्या किंमती भडकल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg