loader
Breaking News
Breaking News
Foto

लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी, ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयांची प्रतिक्षा संपणार

मुंबई - मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या ऑगस्टमधील १५०० रुपयांच्या हप्त्याचे वितरण १६ सप्टेंबरनंतर डीबीटी प्रणालीद्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यात होणार आहे. विभागाकडून लाभार्थ्यांची अंतिम यादी आणि बँक तपशिलांची तांत्रिक पडताळणी पूर्ण केली जात आहे. विभागाकडून लाभार्थ्यांची अंतिम यादी आणि बँक तपशीलांची तांत्रिक पडताळणी पूर्ण केली जात आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे आणि थेट लाभ हस्तांतरण सुविधा कार्यान्वित आहे, त्यांच्या खात्यात निधी थेट वर्ग केला जाईल. कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय रक्कम जमा व्हावी यासाठी बँकिंग प्रणालीमधील पडताळणी पूर्ण झाल्यानंतर १६ सप्टेंबरनंतर प्रत्यक्ष वितरण सुरू केले जाईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

योजनेचा लाभ विनाअडथळा मिळण्यासाठी लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याची स्थिती तपासणे गरजेचे आहे. बँक खाते आधार संलग्न नसणे किंवा केवायसी प्रलंबित असल्यास पैसे जमा होण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे ज्या महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नाही, त्यांनी आपल्या संबंधित बँकेत जाऊन आधार लिंकिंग आणि डीबीटी सुविधा सक्रिय असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

टाईम्स स्पेशल

राज्यातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आरोग्य आणि पोषण यामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते. यापूर्वीचा हप्ता अनेक लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला असून आता ऑगस्टच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg