देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील चाफवलीच्या पांडवकालीन एका दगडातील चाफनाथ मंदिरात तिसऱ्या सोमवारी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत विठ्ठल रखुमाई वारकरी संप्रदाय चाफवली यानी भक्तिमय रंगत आणली. दरवर्षी श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी चाफवलीच्या चाफनाथ मंदिरात तुफान गर्दी होते. मोत्यासारखे तुषार उडवणाऱ्या धबधब्याचे आकर्षण आणि श्रावण सोमवारातील भक्तीचा आनंद लुटण्यासाठी भावीक गर्दी करत असतात. या सोमवारी भाविकांनी फार गर्दी केली होती त्यातच वारकरी दिंडीने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणाने वेगळीच रंगत आणली.
या वारकरी दिंडीमध्ये चाफवली शाळा नंबर 1, शाळा नंबर 2 ,शाळा नंबर 3 च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीही भाग घेतला होता. हातात भगवे झेंडे, गळ्यात टाळ, मुखाने विठ्ठल विठ्ठल हरी नामाचा गजर करीत ही दिंडी चाफनाथ मंदिरात पोहोचली आणि वातावरण भक्तिमय झाले. ही दिंडी चाफवली येथील राजाराम (बुवा) भालेकर, विजय घुमे, गंगाराम (गावकर) करंवंजे, काशिनाथ भातडे, किसन केसव, सिताराम दर्डी, मेघी गावातील गावकर करंबेळे, दाभोळे कोंडवाडीतील चाळके महाराज, यांच्यासह आबालवृद्ध, महिला वर्ग यांनी भाग घेतला होता. चाफवली भटाचा कोंड येथील गणपत केदारी यांनी या भक्तगणांसाठी प्रसादाचे वाटप केले.

















































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.