कर्जत (प्रतिनिधी) - पळसदरी येथे मराठा क्रांती स्वराज संघटनेच्या खालापूर व कर्जत तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे उत्साहात संपन्न झाली. संघटनेची आगामी वाटचाल, संघटनात्मक बांधणी, सामाजिक उपक्रम तसेच स्थानिक प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीबाबत मराठा क्रांती स्वराज संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी माहिती दिली. संघटनेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने आणि संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे राज्य सरचिटणीस प्रकाश चव्हाण यांनी आपले मत व्यक्त करत संघटनेच्या पुढील कार्याबाबत मार्गदर्शन केले. तळागाळातील नागरिकांपर्यंत संघटनेचे विचार आणि कार्य पोहोचविण्यासाठी जनसंपर्क वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाध्यक्ष विलास चाळके यांनी संघटना अधिक मजबूत आणि व्यापक कशी करावी, याबाबत सविस्तर चर्चा केली. प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि परिसरात संघटनेची बांधणी मजबूत करणे, नवीन कार्यकर्त्यांना जोडणे, सक्रिय पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देणे तसेच युवकांचा संघटनेच्या कार्यात सहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खालापूर तालुका अध्यक्ष दिनेश महाडिक यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संघटनेच्या आगामी वाटचालीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करावे, स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या प्रश्नांचा पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीस जिल्हाध्यक्ष विलास चाळके, खालापूर तालुका अध्यक्ष दिनेश महाडिक, शहराध्यक्ष नीलेश विचारे यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीदरम्यान आगामी काळात राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम, संघटनेची कार्यपद्धती, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि जनहिताच्या प्रश्नांवर संघटनेची भूमिका याबाबत चर्चा करण्यात आली. संघटनेची ताकद वाढविण्यासाठी गावागावात संपर्क वाढवून नवीन कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडण्यावरही भर देण्यात आला.
पदाधिकाऱ्यांनी बैठकीत विविध सूचना व मते मांडली. संघटनेचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने, समन्वयाने आणि एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय मिडिया अध्यक्ष दैनिक बेधडक महाराष्ट्र संपादक व न्यूज नेटवर्क मालक मुद्रक प्रकाशक अभिजित दरेकर राज्य सरचिटणीस प्रकाश चव्हाण, जिल्हाध्यक्ष विलास चाळके आणि तालुका अध्यक्ष दिनेश महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर-कर्जत परिसरात संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठात पार पडलेल्या या नियोजन बैठकीमुळे संघटनेच्या आगामी कार्याला नवी दिशा मिळाली असून, सामाजिक व जनहिताच्या विविध प्रश्नांवर आगामी काळात संघटना सक्रियपणे काम करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

















































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.