loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशोत्सवासाठी सावंतवाडी रेल्वेस्थानकातून दोडामार्ग - तिलारीसाठी थेट एसटी सेवा सुरू करा, बाबुराव धुरी यांची एसटी महामंडळाकडे मागणी

साटेली भेडशी (प्रतिनिधी) - गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने सावंतवाडी रेल्वे स्थानकावर दाखल होणार्‍या हजारो चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानक ते दोडामार्ग-तिलारी परिसरासाठी थेट एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे जिल्हाप्रमुख बाबुराव दत्ताराम धुरी यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाकडे केली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात जाण्यासाठी थेट एसटी सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना प्रथम सावंतवाडी बसस्थानक गाठावे लागते. यासाठी त्यांना अतिरिक्त रिक्षा भाडे द्यावे लागते. त्यानंतर पुढील प्रवासासाठी दोन ते तीन वेळा बस बदलावी लागत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि मोठ्या प्रमाणात सामान घेऊन येणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही गैरसोय लक्षात घेता गणेश चतुर्थीच्या किमान पाच दिवस आधीपासून सावंतवाडी रेल्वे स्थानक ते बांदा, दोडामार्ग मार्गावरील प्रमुख थांबे ते तिलारी-पाट्ये पुनर्वसन केंद्रांपर्यंत थेट एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी धुरी यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन ही सेवा नियमित व पुरेशा फेर्‍यांसह उपलब्ध करून देण्यात यावी. रेल्वे स्थानकावरून थेट बस उपलब्ध झाल्यास दोडामार्ग तालुक्यातील चाकरमानी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या मागणीवर आपल्या स्तरावरून तातडीने कार्यवाही न झाल्यास हा प्रश्न परिवहन मंत्र्यांकडे मांडावा लागेल, असा इशाराही बाबुराव धुरी यांनी दिला आहे. तसेच, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दोन दिवसांत द्यावा, अशी मागणी त्यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg