खेड - तालुक्यातील आंबवली प्रभागातील ४ थी, ५ वी, ७ वी व ८ वी शिष्यवृत्तीधारक तसेच पात्र विद्यार्थ्यांसह स्काऊट-गाईड बुलबुल सुवर्णबाण राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थिनींचा भव्य मिरवणूक काढून उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाचे कौतुक करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या भव्य मिरवणुकीची सुरुवात वरवली केंद्रशाळेपासून करण्यात आली. मिरवणुकीमध्ये मुलांना पुष्पहार घालून सचिन धाडवे, जि प सदस्य सुकीवली गट यांनी मिरवणुकीची सुरुवात केली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक आंबवली बीट शाळेपर्यंत नेण्यात आली. आंबवली बीट शाळेत, ज्युनियर कॉलेज आंबवली मधील अकरावी कॉमर्स च्या मुलांनी दिंडीच्या माध्यमातून व गुणवंत विद्यार्थ्यांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत केल्यानंतर विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ४ थी, ५ वी, ७ वी व ८ वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पात्र विद्यार्थी तसेच स्काऊट-गाईड बुलबुल सुवर्णबाण राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींचा विशेष गौरव करण्यात आला.
तसेच राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत ६ वा क्रमांक प्राप्त करणाऱ्या चिन्मयी श्रीकृष्ण खांडेकर हिचा विशेष सत्कार सुकिवली गटाचे जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या गुणवंत शिक्षकांचाही यावेळी सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन विशेष गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण यांचे मोठे योगदान असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले. या कार्यक्रमाला सुकिवली गटाचे जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे , तिसंगी गणाचे पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, खेड पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी गायत्री माने, तसेच न्यू इंग्लिश स्कूल आंबवलीचे चेअरमन विश्वास कदम, माजी जि प सदस्य शांताराम यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य दर्शनाताई मोरे, पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी संतोष भोसले तसेच शिक्षण विस्तार अधिकारी संदीप कंदुरकर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रियंका चंद्रशेखर यादव, आंबवली गावचे उपसरपंच विजय केशव यादव, वरवली गावच्या सरपंच प्राजक्ता दिपक यादव, आंबवली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साक्षी सतीश यादव, आंबवली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गोगावले तसेच शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, यांच्यासह वरवली केंद्रातील विविध शाळांचे व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, आजी-माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच आंबवली बीटमधील केंद्रप्रमुख विनायक नलावडे, संतोष सपकाळ , दिपक सोनवणे आंबवली बीटमधील सर्व शिक्षकवृंद तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी आंबवली बीट शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण खांडेकर व उपशिक्षिका रसिका रेवाळे (खांडेकर ) तसेच सर्व शिक्षकवृंदाने विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक समितीचे धडाडीचे कार्यकर्ते शरद भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण खांडेकर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही भव्य मिरवणूक आणि सत्कार सोहळा आंबवली प्रभागातील शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.

















































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.