loader
Breaking News
Breaking News
Foto

चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात जनआरोग्य समितीची सभा संपन्न; रिक्त पदे तातडीने भरण्याच्या अध्यक्षांच्या सक्त सूचना

​चांदेराई : आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्राची जनआरोग्य समितीची महत्त्वाची सभा नुकतीच उत्साहात पार पडली. समितीचे अध्यक्ष महेंद्र झापेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रुग्णालयातील रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, विशेषतः अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे फार्मासिस्टचे पद तात्काळ भरण्यात यावे, अशा सक्त सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. ​सभेच्या सुरुवातीस काही जुने आणि अनुभवी कर्मचारी आजच्या सभेचे औचित्य साधून आपल्या मूळ पदावर पुन्हा हजर झाल्याबद्दल उपस्थितांनी तीव्र समाधान व्यक्त केले. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला सफाई कामगारांचा प्रश्न आता निकाली निघाला असून, उद्या ९ तारखेपासून सफाई कामगार प्रत्यक्ष कामावर रुजू होणार असल्याने स्वच्छताविषयक मोठा प्रश्न सुटला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, परत येथील कर्मचारी त्यांच्या जागेवरून अन्यत्र हलवू नये, अशा स्पष्ट सूचनाही अध्यक्षांनी दिल्या. ​सभेमध्ये परिसरातील संभाव्य रोगराईचा सखोल आढावा घेण्यात आला. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना ताटकळत राहावे लागू नये तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी रुग्णांना बसण्यासाठी एक प्रशस्त हॉल तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या वेळी घेण्यात आला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इतर भौतिक गरजांचा सविस्तर आढावा घेऊन परिसराची स्वच्छता चोख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. ​रुग्णांच्या सोयीसाठी केंद्रात दर्जेदार बैठक व्यवस्था सुनिश्चित करणे, वीज पुरवठा आणि पंख्यांची पुरेशी व सुरक्षित व्यवस्था राखणे, जेणेकरून उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याचा प्रत्यक्ष लाभ होईल, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. याशिवाय, रुग्णालयातील औषध पुरवठ्याचा आढावाही घेण्यात आला.

टाईम्स स्पेशल

​महाराष्ट्र शासनाचे मंत्री ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपडे पालटून येथील रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करू, असा ठाम विश्वास अध्यक्ष महेंद्र झापेकर यांनी या वेळी व्यक्त केला. ​या महत्त्वपूर्ण बैठकीला समितीचे अध्यक्ष महेंद्र झापेकर यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, पंचायत समिती सदस्या कांचन नागवेकर, पंचायत समिती सदस्य संयोग दळी, डॉ. मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी, टिकेचे सरपंच भिकाजी शिनगारे, रवींद्र उर्फ आप्पा कांबळे, दत्ताराम येरीम, गोरखननाथ बने, प्राजक्ता गोविलकर, वृंदा किर यांसह विविध विभागांचे अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg